Home राजधानी मुंबई धान उत्पादकांना ७०० रुपये प्रतिक्विंटल प्रोत्साहन

धान उत्पादकांना ७०० रुपये प्रतिक्विंटल प्रोत्साहन

59

cabinate decision : आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरीप पणन हंगाम २०२०-२१ मधील खरेदी केलेल्या धानासाठी केंद्र्र शासनाने निश्चित केलेल्या दराव्यतिरिक्त धान उत्पादक शेतकºयांना प्रोत्साहनपर प्रतिक्विंटल ७०० रुपये देण्यास आज, मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. या निर्णयामुळे १४०० कोटी रुपये इतका अतिरिक्त खर्च येईल.
खरीप हंगाम २०२०-२१ साठी केंद्र शासनाने धानाची ( paddy ) आधारभूत किंमत साधारण धानासाठी १,८६८ रुपये व ग्रेड धानासाठी १८८८ रुपये इतकी निश्चित केली आहे. मात्र, धान उत्पादक शेतकरी अडचणीत असल्यामुळे प्रोत्साहनपर राशी देण्याचा निर्णय घेण्यात आला. केवळ आॅनलाईन खरेदी होणाºया धानासाठीच ही राशी मिळेल.
दरम्यान, यंदा १ कोटी ७८ लाख क्विंटल इतकी अपेक्षित धान खरेदी होण्याचे संकेत वर्तवण्यात आले आहे.
कापूस खरेदी केंद्रे सुरू २७ नोव्हेंबरपासून
राज्यातील कापूस खरेदी केंद्रे सुरू करून त्यांच्यामार्फत कापूस खरेदीस सुरुवात होत आहे. यासंदर्भात आज मंत्रिमंडळ बैठकीत पणन विभागाचे प्रधान सचिव यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक महासंघाद्वारे पहिल्या टप्प्यामध्ये २७ नोव्हेंबर २०२० पासून एकूण १६ कापूस उत्पादक जिल्ह्यांतील २१ केंद्र्रामध्ये तसेच ३३ जिनिंग मिलमध्ये कापूस खरेदी केंद्रे सुरू करण्यात येत आहेत.
दुसºया टप्प्यामध्ये निविदेस प्रतिसाद न मिळालेल्या बीड, परभणी आणि जळगाव अशा ३ जिल्ह्यात ९ कापूस खरेदी केंद्रे डिसेंबर २०२० च्या पहिल्या आठवड्यामध्ये सुरू होतील. यंदा ४२.८६ लक्ष हेक्टर्समध्ये कापूस पेरा झालेला असून एकूण ४५० लक्ष क्विंटल इतके कापूस उत्पादन होण्याची शक्यता आहे. याबाबत केंद्रीय कापूस खरेदी निगम (सीसीआय) आणि महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक महासंघ यांच्यातर्फे खरेदीचे तंतोतंत नियोजन करण्यात आले आहे.