वन विभागांतर्गतच्या अडचणी प्राधान्याने सोडवाव्यात

राजधानी मुंबई

मुंबई : वन विभागाच्या विविध अडचणींसंदर्भात तसेच वन तलाव, गौण वनोपज आदी विषयांबाबत मंगळवारी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या अध्यक्षतेखाली व वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी विभागांतर्गत येणाºया विविध समस्या प्राधान्याने सोडविण्याची सूचना उपाध्यक्ष झिरवळ यांनी केली.
वन विभाग, आदिवासी विकास विभाग व जलसंधारण विभाग यांच्या माध्यमातून वनाचा विकास कसा करता येईल तसेच तेथील स्थानिकांना रोजगार कशाप्रकारे उपलब्ध करता येईल, याविषयी चर्चा पार पडली. ‘संत तुकाराम वनग्राम योजनें’तर्गत गठित केलेल्या समितीच्या माध्यमातून वृक्ष लागवडीकरिता लोकांना प्रोत्साहित करावे, असेही श्री.झिरवळ यांनी सांगितले.
नाशिकमधील संयुक्त वन व्यवस्थापन कार्यक्रमाला चालना देण्याची सूचनाही त्यांनी केली. नाशिक विभागातील मानव आणि बिबट्याच्या संघषार्बाबत चिंता व्यक्त करुन तेथील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी वन विभागाच्या माध्यमातून काय प्रयत्न करण्यात येत आहेत, याबाबत श्री.झिरवळ यांनी आढावा घेऊन ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आधुनिक साधनांचा वापर करण्याची सूचना केली.
वनपट्टेधारकांसाठी लागवडीखालील क्षेत्रात सपाटीकरण करण्याबाबत तसेच वनपट्ट्यांच्या जमिनीवर शेतीविषयक कामे, वन विभागातील सोलर वॉटर हिटर पुरविणे, सीमेंट नाला बांधणे, सुतार समाजाला लाकूड खरेदीची परवानगी देणे आदींवर चर्चा करण्यात आली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *