Home राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय अमेरिकेत सत्ता हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू

अमेरिकेत सत्ता हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू

6

वॉशिंग्टन : अमेरिकाचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्ता हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे त्यांनी आपला पराभव स्वीकारल्याचे राजकीय तज्ज्ञांनी म्हटले आहे.
अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाच्या जो बायडन ( joe biden ) यांची नवे राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली. मात्र, पराभूत उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचं सांगून त्याविरोधात न्यायालयात जाणार असल्याचे स्पष्ट केले होते.
अमेरिकन निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर तीन आठवडे झाले तरी ट्रम्प आपल्या निश्चयावर ठाम होते. यादरम्यान त्यांनी जो बायडन यांच्यावर अनेकवेळा टीका केली.
दरम्यान, आता ट्रम्प यांनी अमेरिकेच्या ‘जनरल सर्व्हिस आॅफ अ‍ॅडमिनिस्ट्रेशन’ला सत्ता हस्तांतरण प्रक्रिया सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. प्रक्रियानुसार जे आवश्यक आहे ते केले पाहिजे. त्यानंतर जनरल सर्व्हिस आॅफ अ‍ॅडमिनिस्ट्रेशनच्या प्रमुखांनी बायडन यांना पत्र लिहून त्यांना सत्ता हस्तांतरणाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याचे आमंत्रण दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here