Home राष्ट्रीय पश्चिम किनारपट्टीला ‘निवार’चा धोका

पश्चिम किनारपट्टीला ‘निवार’चा धोका

91

nivar cyclone : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे ‘निवार’ चक्रीवादळात  रुपांतर झाले असून तामिळनाडु, पदुच्चेरी राज्यांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. जागतिक हवामान संघटनेच्या नियमांनुसार ‘निवार’ नाव इराणने सूचवले आहे.
निवार’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने किनारी प्रदेशात हाय अलर्ट जाहीर केला असून संबंधित सात जिल्ह्यांतील प्रशासनाला सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संबंधित जिल्हात मंगळवारपासून आंतर जिल्हा बससेवा बंद करण्यासह काही ठिकाणच्या रेल्वे सेवाही बंद झाल्या आहेत.
शेजारच्या आंध्र प्रदेशातही रॉयल सीमा क्षेत्र आणि इतर किनारी भागात पुढील तीन दिवसांत मुसळधार पावसासंबंधी ‘हाय अलर्ट’ जाहीर केला आहे.
‘निवार’ मुळे ( nivar cyclone ) रायलसीमा, तेलंगणासह विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात २५ ते २७ नोव्हेंबर दरम्यान पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. २५ नोव्हेंबरला विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. २६ नोव्हेंबर रोजी विदर्भात काही ठिकाणी तर, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. २७ नोव्हेंबरला मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. २६ नोव्हेंबर रोजी नांदेड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळण्याचे संकेत आहेत. २७ नोव्हेंबर रोजी सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस अपेक्षित आहे. भंडारा, चंद्र्रपूर, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यात २६ नोव्हेंबर रोजी सर्वदूर हलका ते मध्यम स्वरुपाचा, तर नागपूर, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.