Home राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचे निधन

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचे निधन

77

नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल आज, बुधवारी पहाटे निधन झाले. वयाच्या 71 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांच्यावर गुरुग्राम येथील मेदांता हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.
माहितीनुसार, अहमद पटेल यांनी मागील आॅक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाची लागण झाली होती. त्यांचे कोरोनाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. अहमद पटेल यांचे पुत्र फैसल यांनी याबाबतची माहिती दिली. ते गुजरातमधून राज्यसभा खासदार होते. काँग्रेसचे चाणक्य म्हणून त्यांची विशेष ओळख होती. सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार म्हणूनही ते जबाबदारी सांभाळत होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी आहे. दरम्यान, पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासह वरिष्ठ नेत्यांनी तसेच राहुल गांधी, प्रियंका गांधी वढेरा यांनी दु:ख व्यक्त केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here