Home राजधानी मुंबई आयटीआयमध्ये नवीन अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्र सुरू करावीत

आयटीआयमध्ये नवीन अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्र सुरू करावीत

67

मुंबई : प्रशासनाने ‘आॅन जॉब’ प्रशिक्षण योजना कार्यान्वित करावी. औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) नवीन अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्र सुरू करावीत. तसेच कौशल्य विद्यापीठ निर्माण करण्याबाबत विचार करण्यात यावा, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
वर्षा निवासस्थानी आज कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सादरीकरण झाले त्यावेळी मुख्यमंत्री श्री. ठाकरे बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय महेता, अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या सचिव अंशु सिन्हा, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्त दीपेंद्र्रसिंह कुशवाह उपस्थित होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक तरुणांना रोजगार गमावावे लागले आहेत. या पार्श्वभूमीवर नव्याने रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत, त्याप्रमाणे कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाने नवीन मागणीप्रमाणे तरुणांना प्रशिक्षित तयार करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याची सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( udhhav thakare ) यांनी केली.
लॉकडॉऊन काळातही विभागामार्फत एक लाख अठ्ठेचाळीस हजार रोजगार उपलब्ध केले आहेत, ही चांगली बाब आहे; परंतु लॉकडाऊननंतर निर्माण झालेल्या नवीन परिस्थितीत जसे रोजगार निर्माण होतील त्याला अनुसरून प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्याचे काम विभागाने करावे. यासाठी सविस्तर असा कृती आराखडा लवकर तयार करण्यात यावा, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली.

प्रत्येक जिल्ह्याच्या भौगोलिक रचना स्थानिक परिस्थितीनुसार रोजगार प्रशिक्षण के ंद्रे सुरू करावीत. समृद्धी महामार्गालगतच्या जिल्ह्यांत नवीन रोजगार उपलब्ध होतील त्याप्रमाणे प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्याचे नियोजन करावे, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
यावेळी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्त दीपेंद्र्रसिंह कुशवाह यांनी भविष्यातील योजनांचे सादरीकरण केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here