Home राजधानी मुंबई धान खरेदी केंद्रांची संख्या वाढवण्यासंबंधी निर्देश

धान खरेदी केंद्रांची संख्या वाढवण्यासंबंधी निर्देश

165

मुंबई : धान उत्पादन आणि विक्रीच्या प्रमाणात खरेदी केंद्र वाढवावेत. तसेच, शेतकºयांचेच सर्व धान खरेदी करावेत, असे निर्देश अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहेत.
गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील धान खरेदीबाबत चर्चा करण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते.
धान उत्पादक शेतकºयांना माल विक्रीत अडचण येऊ नये. तसेच, खरेदी थांबता कामा नये यासाठी जास्तीत जास्त खरेदी केंद्र चालू करण्याचे आदेश अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी प्रशासनाला दिले आहेत.
धान खरेदी करण्याच्या कामात मदत व्हावी यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीची मदत घेऊन धान खरेदीचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे, अशी सूचना खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केली. त्यानुसार ज्या ज्या कृषी उत्पन्न बाजार समितीकडून धान खरेदीसाठी मागणी करण्यात येईल त्यांना धान खरेदीची परवानगी देण्यात यावी तसेच धान खरेदीच्या कामामध्ये एपीएमसी ही नोडल एजन्सी म्हणून काम पाहिल आणि धान खरेदी करणाºया दोन्ही एजन्सीला मदत करेल, असे निर्देश श्री.भुजबळ यांनी दिले.
बैठकीला, गृहमंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल देशमुख, खासदार प्रफुल्ल पटेल, आदिवासी विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आ.मनोहर चंद्रिकापुरे, आमदार राजू कारेमोरे, अन्न, नागरी पुरवठा विभागाचे सचिव विलास पाटील, मार्केटिंग फेडरेशनचे महाव्यवस्थापक डॉ.अतुल नेरकर, व्यवस्थापकीय संचालक एस. बी. तेलंग, आदिवासी विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक श्री. राठोड, अन्न नागरी पुरवठा विभागाचे सहसचिव मनोजकुमार सूर्यवंशी आदी उपस्थित होते.