Home उपराजधानी नागपूर मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला 12 वर्षे पूर्ण

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला 12 वर्षे पूर्ण

39

नागपूर : मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज 12 वर्षे पूर्ण होत आहेत. यात वीरमरण आलेल्या सुरक्षा दलातील जवानांना देशभरात आदरांजली वाहण्यात येत आहे.
पाकिस्तानातून समुद्रमार्गे आलेल्या दहशतवाद्यांनी 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईतील ताज हॉटेलसह सहा ठिकाणी हल्ला केला. यात 166 जणांचा मृत्यू झाला, तर 300 हून अधिक जण जखमी झाले होते. याशिवाय महाराष्ट्र पोलिस दलातील अधिकाºयांना वीरमरण आले. सर्वाधिक मृत्यू छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे झाले. तसेच, ताज हाँटेलमध्ये 31 जणांचे प्राण घेतले. जवळजवळ 60 तास दहशतवादी आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये चकमक सुरू होती. या हल्ल्यातील मुख्य दहशतवादी अजमल कसाब याला पोलिसांनी जिवंत पकडले. त्यानंतर त्याला फाशी देण्यात आले.
‘अभिवृत्त’ च्या वतीने शहिदांना आदरांजली!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here