Home राजधानी मुंबई आता अन्नपदार्थ होणार अधिक सुरक्षित

आता अन्नपदार्थ होणार अधिक सुरक्षित

71

मुंबई : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेला सुरक्षित, निर्भेळ आणि आरोग्यदायी अन्न मिळावे यासाठी अन्न सुरक्षा अंकेक्षण (फूड सेफ्टी आॅडिट) करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र्र शिंगणे यांनी यासंबंधी माहिती दिली़
कोरोना संसर्ग होऊ नये यासाठी ज्या मार्गदर्शक सूचना दिल्या जातात त्यात, हात धुणे, सामाजिक अंतर राखणे या बरोबरच स्वच्छ आणि व्यवस्थित शिजवलेले अन्न खाणे यावरही भर दिला जातो. टाळेबंदीनंतर आता हॉटेल्स, आणि बाहेरील खाद्यपदार्थ विक्रीस परवानगी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. शिंगणे यांनी ही मोहीम हाती घेण्याचे निर्देश दिले आहेत.
अन्नपदार्थ पुरवठा आणि तयार करणाºया आस्थापनांनी त्यांना दिलेल्या निकषांची पूर्तता करावी आणि केंद्र शासनाच्या ‘फूड सेफ्टी अँड स्टॅण्डर्ड अथॉरिटी आॅफ इंडिया’ (एफएसएसएआय) यांनी अधिकृत मान्यता दिलेल्या 26 संस्थांमार्फत (आॅडिट एजन्सी) अंकेक्षण करून घ्यावे. या मानकांची पूर्तता करणाºया आस्थापनांनी मानकांची समाधानकारक पूर्तता केल्यास संस्थांमार्फत अन्न तयार करणाºया आस्थापनांना प्रमाणपत्र दिले जाईल. यामुळे ग्राहकांना सुरक्षित आणि आरोग्यदायी अन्नपदार्थ पुरविले जाण्याची हमी मिळेल.

राज्यातील अन्नप्रक्रिया घटक असे …
-कॅटरर्स 6,136
-हॉटेल्स आणि रेस्टॉरन्ट्स 39,490
-डेअरी प्रक्रिया 3,165
-कत्तलखाने 62
– अन्न साठवणूक केंद्र 2,341

अन्न बनवणाºया आस्थापना विविध अ‍ॅपच्या माध्यमातून अन्न ग्राहकांपर्यंत पोहचवित असतात. अन्न पदार्थांच्या दर्जानुसार त्यांना ए- बी-सी असे ग्रेडिंग ग्राहक देतात. ए ग्रेड व्यतिरिक्त बी, सी अशा श्रेणीच्या हॉटेलमधून अन्न घेणे ग्राहक टाळतात. अंतर्गत व्यावसायिक स्पर्धमुळे हॉटेल व्यावसायिकांमध्ये स्वच्छ, सुरक्षित, आरोग्यदायी वातावरण राखण्यास स्पर्धा निर्माण होते. याच धर्तीवर या 26 आॅडिट संस्थांमार्फत ‘हायजिन रेटिंग’ घेण्याची कार्यवाही हाती घेण्यात येईल जेणेकरून अन्नपदार्थ पुरविणाºया आस्थापनांमध्ये चढाओढ निर्माण होऊन ग्राहकांना सुरक्षित अन्न पदार्थ मिळू शकतील. याचबरोबर ग्राहकांचा फिडबॅक घेण्यासाठी आणि ग्राहकांनाही रेटिंग देता यावे यासाठी विशेष अप तयार करण्यात यावे, असे निर्देश डॉ. शिंगणे यांनी दिले.