Home राजधानी मुंबई क्रीडा प्रमाणपत्र देण्यासाठी नवीन नियमावली आणणार

क्रीडा प्रमाणपत्र देण्यासाठी नवीन नियमावली आणणार

52

मुंबई : राज्यामध्ये बोगस प्रमाणपत्राच्या आधारे खेळाडू दाखवून शासकीय सेवेचा लाभ घेतल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. असे प्रकार भविष्यात होणार नाहीत यासाठी नवीन नियमावली आणणार असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी सांगितले.

राज्यातील क्रीडा विभागाच्या विभागनिहाय आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी क्रीडा राज्यमंत्री अदिती तटकरे, क्रीडा विभागाचे आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांच्यासह क्रीडा विभागाचे वरिष्ठ अधिकारी बैठकीस उपस्थित होते.
राज्यात यापुढे बोगस प्रमाणपत्र देण्याचे कोणाचे धाडस होणार नाही, अशी नियमावली तयार करण्यात येणार आहे. नोकरीत प्रमाणपत्राचा लाभ घेताना प्रमाणपत्र पडताळणी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात येणार आहे.

राज्यात उभारण्यात येणाºया क्रीडा संकुलासाठी जो निधी वितरित करण्यात आला, त्याची कामे तातडीने सुरु करावीत. जागेचा प्रश्न निर्माण झाला तर संबंधित विभागाशी संपर्क करून त्यातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करावेत. यापुढे निधी वितरण झाल्यानंतर निधी खर्च करण्याची कार्यवाही तत्काळ करावी. तालुका, जिल्हा आणि विभागीय क्रीडा संकुलांची कामे गुणवत्तापूर्ण असावीत, यासाठी क्रीडा अधिकाºयांनी दक्ष राहावे. काही ठिकाणी निधी कमी पडत असेल तर जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना मंत्र्यांनी केल्या.
यावेळी क्रीडा राज्यमंत्री तटकरे यांनीही काही सूचना केल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here