Home प्रादेशिक पश्चिम महाराष्ट्र पंतप्रधान मोदी यांनी दिली सीरमला भेट

पंतप्रधान मोदी यांनी दिली सीरमला भेट

76

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सीरम इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाला भेट देऊन कोविड-१९ विषाणू प्रतिबंधात्मक लस विकास, उत्पादन, वितरण, साठवण आणि व्यवस्थापन प्रक्रियेची माहिती घेतली. यावेळी सीरम इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाचे मुख्य कार्यकारी संचालक डॉ. सायरस पुनावाला, मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला, कार्यकारी संचालक नताशा पुनावाला, शास्त्रज्ञ तसेच संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
प्रारंभी अदर पुनावाला यांनी संस्थेची माहिती दिली. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी सीरम इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया या संस्थेतील कोविड-१९ प्रतिबंधात्मक लस निर्मितीच्या अनुषंगाने सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांना लस देण्याच्या प्रयत्नांची पूर्वतयारी, आव्हाने आणि नियोजन यांची माहिती शास्त्रज्ञांनी दिली.
दरम्यान, पंतप्रधानांनी आज सकाळी गुजरातमध्ये अहमदाबाद येथील झायड्स बायोटिक पार्क आणि त्यानंतर हैदराबादमधील भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड या संस्थेला भेट दिली.