Home BREAKING NEWS आधारभूत भावाने ३.१० कोटी टन तांदळाची खरेदी

आधारभूत भावाने ३.१० कोटी टन तांदळाची खरेदी

65

नवी दिल्ली : केंद्र सरकारने यंदाच्या खरीप पणन हंगामात आधारभूत भावाने ३ कोटी १० लाख टन तांदळाची खरेदी केली.
गेल्या वर्षाच्या तुलनेत यावेळी खरेदीत १८.७८ टक्के वाढ झाली आहे. पंजाब, हरयाणा, गुजरात, महाराष्ट्रासह सर्व तांदूळ उत्पादक राज्यांमध्ये ही खरेदी सुरळीत चालू असल्याचे केंद्रीय कृषी मंत्रालय सूत्रांनी सांगितले.
एकूण खरेदीत पंजाबचा वाटा २ कोटी २ लाख टन, म्हणजे तब्बल ६५.२४ टक्के आहे. ५८ हजार ६४४ कोटी रुपयांच्या या खरेदीचा लाभ २८ लाख ४५ हजार शेतकºयांना मिळाला आहे.