Home रानशिवार आयआयटी, एनआयटी अभ्यासक्रम आता मातृभाषेतून

आयआयटी, एनआयटी अभ्यासक्रम आता मातृभाषेतून

75

नवी दिल्ली: पुढील शैक्षणिक सत्रापासून विद्यार्थ्यांना आता आयआयटी (इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ
टेक्नॉलॉजी ) आणि एनआयटी (नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी) इंजिनीअरिंगचा अभ्यासक्रम हा मातृभाषेत करता येणार आहे.
माहितीनुसार, केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांच्या अध्यक्षतेखाली एका उच्चस्तरीय बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला.
तांत्रिक शिक्षण विशेषत: अभियांत्रिकी शिक्षण मातृभाषेत उपलब्ध करून देण्याचा लाभकारी निर्णय सरकारच्या वतीने घेण्यात आला. ही सुविधा पुढील शैक्षणिक सत्रापासून अंमलात येणार आहे. यासाठी काही आयआयटी आणि एनआयटी संस्थांना निवडण्यात येणार आहे. या बैठकीत राष्ट्रीय परीक्षा संस्थांकडून (एनटीए) स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यासक्रम आणण्याचाही विचार करण्यात आला आहे.
आयआयटी आणि एनआयटी अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम मातृभाषेत सुरू केल्याने त्याचा फायदा देशातील विद्यार्थ्यांना होणार असल्याची आशा केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी व्यक्त केली आहे.