Home प्रादेशिक पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्यावर अंत्यसंस्कार

राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्यावर अंत्यसंस्कार

62

पंढरपूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक आमदार भारत भालके ( mla bharat bhalake ) यांच्यावर शनिवारी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास शासकीय इतमामात मूळ गाव सरकोली येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. पुत्र भगीरथ भालके यांनी पार्थिवाला अग्नी दिला. यावेळी हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.
भारत भालके यांच्या अंत्यसंस्काराला उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार प्रशांत परिचारक, प्रणिती शिंदे, संजयमामा शिंदे़, यशवंत माने यांच्यासह जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते उपस्थित होते. त्यापूर्वी सकाळी ११ वाजता पुणे येथून भालके यांचे पार्थिव गुरसाळे येथे आणण्यात आले. श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यात पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात आले. त्यानंतर सुरुवातीला पंढरपूर-मंगळवेढा आणि दुपारच्या सुमारास सरकोली येथील निवासस्थानी त्यांचे पार्थिव पोहचले. चार वाजताच्या सुमारास अजित पवार, दत्तात्रय भरणे यांनी भालके यांना श्रद्धांजली वाहिली.
दरम्यान, भारत भालके यांचे कोरोनामुळे शुक्रवारी मध्यरात्री पुण्यातील रूबी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले होते. त्यापूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भेट घेतली होती. ३० आॅक्टोबर रोजी प्रथम संसर्ग झाल्याने वेळीच उपचार घेत त्यांनी आजारावर मात केली. मात्र, काही दिवसांत पुन्हा तब्येत बिघडली. प्रकृती सातत्याने खालावत गेल्याने अखेर प्राणज्योत मालवली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here