Home आध्यात्मिक गुरूंचे महत्त्व…SAAY passaydan

गुरूंचे महत्त्व…SAAY passaydan

63
rajindar singhji

 संत राजिन्दर सिंहजी महाराज

सांसारिक जीवनात जेव्हा आपल्याला एखादया विषयाचा अभ्यास करायचा असतो, तेव्हा आपण अशा व्यक्तीकडे जातो, जी त्यात पारंगत आहे आणि तो विषय ती व्यक्ती आपल्याला शिकवू शकते. अशाच प्रकारे आपल्याला आपला आध्यात्मिक विकास करायचा असेल तर आपल्याला अशा व्यक्तीकडे जावे लागेल, जी आध्यात्मात पारंगत आहे. एक पूर्ण सद्गुरू आध्यात्मात पारंगत असतात. सुदैवाने प्रत्येक वेळी या पृथ्वीतलावर एक ना एक पूर्ण सद्गुरू अस्तित्वात असतात, जे आपल्याला आपल्यातील आत्मिक शक्तीशी जोडण्यासाठी मदत करतात. प्रत्येक युगात असे संत महात्मे पृथ्वी वर येत असतात जे आमच्या आत्म्याला आंतरिक यात्रेवर घेऊन जाण्यात समर्थ असतात.

संत मताचे संत सांगतात, की परमेश्वराची सत्ता ही कुठल्या न कुठल्या मानवी देहातून कार्य करत असते. मनुष्य इतर मनुष्यांकडूनच शिकत असतो. संत या जगात येतात आपल्याशी आपल्या स्तरावर येऊन बोलण्यासाठी, अंतरिक अनुभव प्राप्त करण्याची पद्धत आपल्या भाषेत स्पष्ट करून सांगण्यासाठी, जेणेकरून ते आम्हालाही आंतरिक अनुभव करून देऊ शकतील. केवळ बोलून किंवा वाचून आध्यात्म शिकता येत नाही. हे केवळ वैयक्तिक अनुभवातूनच शिकले जाऊ शकते आणि असा अनुभव मात्र आपल्याला संपूर्ण सद्गुरूच देऊ शकतात.

शिष्याला नामदान दिल्यानंतर सद्गुरु सदैव शिष्य सोबत असतात व त्याला सर्व प्रकारे सुरक्षित ठेवतात. सद्गुरूंचे हे संरक्षण केवळ या जगा पुरते मर्यादित नसून त्यानंतरही ते कायम राहते. सद्गुरू शिष्याच्या कर्माचा भार आपल्याकडे घेतात आणि सदैव त्याच्या अवतीभवती असतात. शिष्याच्या शेवटच्या काळातही ते त्याच्याबरोबर राहून, पुढील मंडळांमध्ये त्याचे मार्गदर्शक होतात. त्यावेळी सद्गुरू शिष्याच्या अंतरी प्रकट होऊन, अत्यंत प्रेमाने त्याला आलिंगन देऊन प्रकाशात घेऊन जातात.

करुणा व ममतेने ओतप्रोत सद्गुरू आम्हाला संकटात पाहू शकत नाहीत. सद्गुरू या जगी आम्हाला कर्माच्या चिखलापासून दूर राहण्याची शिकवण देण्यासाठी येतात, आम्ही कर्माच्या चक्रव्यूहातून बाहेर पडावे, अशी त्यांची इच्छा असते, की ज्यामध्ये अडकून आपण पुन्हा पुन्हा या जगात येत असतो. त्यांची इच्छा असते, की आपण आपल्या खºया पित्याच्या घरी परत जावे, जिथे कोणताही क्लेश किंवा मृत्यू नाही. आमच्या जीवनकाळात देखील सद्गुरू आमचे अनेक प्रकारच्या संकटापासून रक्षण करतात. ते आमच्यावर विविध प्रकारे करत असणाºया कृपांचे, मदतीचे आम्हाला ज्ञान देखील नसते. जोपर्यंत आम्ही परमात्म्यासोबत एकरुप होत नाही, तोपर्यंत आमची प्रत्येकप्रकारे मदत करण्यासाठी सद्गुरू सदैव आमच्या सोबत राहतात. एकदा का पूर्ण सद्गुरूंद्वारे नामदान मिळाले,की सद्गुरू आपल्या शिवनेत्रावर विराजमान होतात व जीवनातील प्रत्येक घडामोडीमध्ये आमची मदत करतात.

सद्गुरू हे आपले खरे नि:स्वार्थ मदतगार असतात, त्यांना मदतीच्या बदल्यात कोणत्याही प्रकारचा मोबदला, नाव किंवा कीर्ति नको असते. ते आपल्याला मदत करतात़ कारण ते आपल्या सर्वांवर प्रेम करतात, त्यांचे स्वत:चे अंत:करण प्रभूप्रेमाने ओतप्रोत भरलेले असते.

जर आपल्याला या मानवदेहाचे उद्दीष्ट पूर्ण करायचे असेल आणि आपल्या आत्म्याला परमात्म्याशी एकरुप करायचे असेल, तर आपल्याला पूर्ण सद्गुरूंच्याच चरणी जावे लागेल. आपण परमेश्वराला प्रार्थना केली पाहिजे, की त्याने वर्तमानक्षणी या जगी अस्तित्वात असणाºया पूर्ण सद्गुरूंच्या चरणी आम्हाला लवकरात लवकर घेऊन जावे, जेणेकरून त्यांच्या योग्य मार्गदर्शनाखाली आपण आपली आध्यात्मिक यात्रा शक्य तितक्या लवकर पूर्ण करू शकू आणि आपल्या निजधामी पोहचून कायमस्वरूपी परमात्म्यामध्ये लीन होऊ.

*****

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here