त्या पाटीखाली संज्यानं लिहिलं… Tapori Turaki

रानशिवार

तीन शरीर वर्णाने काळे मित्र सोबतीने जात असतात. अचानक तिथे एक देवी प्रकट होते…
देवी : मी तुमच्या तिघांच्याही एकेकइच्छा पूर्ण करेल. मागा,काय मागायचे ते.
पहिला : मला गोरा वर्ण द्या…तो लगेच गोरा झाला.
दुसरा : मलाही गोरा करा…तोही लगेचच गोरा झाला.
तिसरा (जोरजोराने हसत बोलला): या दोघानांही परत काळे करा

***
आई : किचनमधून लहान प्लेट आण जरा…
छावी : कुठं आहे? दिसत नाहीये.
आई : गॅसची शेगडी दिसतेय का?
छावी : हो..
आई : ती पेटव आणि मोबाईल जाळ त्यात, मग दिसेल.

***
चंद्या 15 मिनिटांतच प्रश्नपत्रिका सोडवून बाहेर पडत होता.
तुरकर बाई : काय झालं, तुला प्रश्नपत्रिका अवघड वाटली का? .
चंद्या : ज्याच्या भरोशावर आलो, तोच मला उत्तर दाखव म्हणतोय!

***

नंदूची अन् बायको प्रीतीची चांगली मोठ्या कष्टाने भट्टी जमली. तिला
व्हिस्कीचा एक पेग दिला…
प्रीती : छी…किती कडू आहे.
नंदू : मग तुला काय वाटलं, मी रोज पिऊन आई ऽऽ श्श करतो व्हय गं…
हे मी कसं पितोय,माझं मलाच माहित.

***
…अर्थातच पुण्यातील घराबाहेरील पाटी.
आमच्या मुलीचं यंदा लग्न करायचं नाही. स्थळ सूचवून त्रास देऊ नका, अपमान करण्यात येईल.
त्या पाटीखाली संज्यानं लिहिलं…
तुमचं स्थळ वेगवेगळ्या ‘स्थळां’सोबत प्रेक्षणीय स्थळी फिरताना दिसतं. स्थळाचे परस्पर ‘स्थलांतर’ होण्याच्या आत लवकर उरकून टाका.

*****

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *