Home पूर्व विदर्भ ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ.शीतल आमटे यांची आत्महत्या

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ.शीतल आमटे यांची आत्महत्या

118

चंद्रपूर : महारोगी सेवा समितीच्या सीईओ ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ.शीतल आमटे-करजगी यांनी आज (30 नोव्हेंबर) आनंदवन येथील राहत्या घरी आत्महत्या केली आहे. वरोरा उपजिल्हा रुग्णालयात नेले असता वैद्यकीय अधिकाºयांनी त्यांना मृत घोषित केले. डॉ. शीतल आमटे यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. विषाचे इंजेक्शन घेऊन त्यांनी आयुष्य संपवल्याचे सांगण्यात येते.