भाजप आमदार किरण माहेश्वरी यांचे कोरोनामुळे निधन

राष्ट्रीय

जयपूर : राजस्थानातील राजसमंद येथील भाजपच्या आमदार किरण माहेश्वरी यांचे आज गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात कोरोना संसर्गाने निधन झाले. वसुंधरा सरकार असताना किरण माहेश्वरी यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून अनेक महत्त्वाच्या मंत्रालयांची जबाबदारी स्वीकारली होती.आमदार किरण माहेश्वरी यांच्या निधनाची माहिती मिळताच उदयपुरात शोकाकूल वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी,राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी आमदार किरण माहेश्वरी यांना ट्वीट करून श्रद्धांजली दिली आहे.
यापूर्वी 27 नोव्हेंबरला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जवळचे मानले जाणारे नेते तसेच पक्षाचे आमदार भारत भालके यांनी सुरुवातीला कोरोनावर मात केली होती. मात्र, विषाणूमुळे फुफ्फुसात झालेला संसर्ग वाढल्याने आॅक्सिजन पातळी खालावल्याने त्यांचा मृत्यू झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *