Home राजधानी मुंबई उर्मिला मातोंडकर  सोमवारी  शिवसेनात?

उर्मिला मातोंडकर  सोमवारी  शिवसेनात?

52

मुंबई : लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या उर्मिला मातोंडकर उद्या, सोमवारी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगली आहे.
गेल्या वर्षी काँग्रेसमध्ये प्रवेश करत त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र त्यांना अपयशाचा सामना करावा लागला. भाजपचे गोपाळ शेट्टी यांच्या विरोधात उर्मिलांना उमेदवारी मिळाली होती.

विधानसभा अध्यक्षपदाच्या वर्षपूर्तीची दमदार वाटचाल

अन्य एका माहितीनुसार,विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त १२ जागांपैकी एका जागेसाठी शिवसेनेने त्यांच्या नावाची शिफारस केली आहे. महाआघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षातील प्रत्येकी चार सदस्यांची यादी राजपालांकडे दिली आहे.
दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित त्या पक्षप्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here