संत श्री गुरू नानकदेव यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे अभिवादन

राजधानी मुंबई

मुंबई : शीख धर्माचे संस्थापक तसेच शिखांचे पहिले गुरू संत श्री गुरू नानकदेव यांची आज जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिवादन केले.
ईश्वर एकच आहे आणि तो चराचरात आहे, असा संदेश त्यांनी दिला. प्रत्येकाशी सन्मानाने आणि प्रेमपूर्वक आदराने वागण्याची त्यांची शिकवण आजच्या काळात खूप महत्त्वाची आहे. संत श्री गुरू नानकदेव यांना जयंतीनिमित्त त्रिवार प्रणाम आणि त्यांच्या जन्मोत्सवाच्या शुभेच्छा.
उपमुख्यमंत्र्यांचेही अभिवादन
शीख धर्मसंस्थापक, शीख बांधवांचे पहिले गुरू, गुरू नानकदेव यांनी जगाला एकता, समता, बंधुता, मानवतेचा संदेश दिला. समाजातील स्पृश्य-अस्पृश्यता, भेदाभेद नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले. गुरू नानकदेव यांच्या विचारातच अखिल मानवजातीचे कल्याण सामावले आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरू नानक जयंतीनिमित्त त्यांच्या कार्यांचे स्मरण करून अभिवादन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *