मुंबई : भाजप नेत्या तसेच माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी कोरोनासंबंधी संसर्ग स्थिती पाहता अलगीकरणात जाण्याचा निर्णय घेतला आहे़ एका ट्विटद्वारे त्यांनी याबाबत माहिती दिली.
पंकजा मुंडे यांनी ट्वीट करून आपली तब्येत ठीक नसल्याचे सांगितले. सर्दी खोकला व ताप असल्याने अलगीकरणाचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी नमुद केले.
दरम्यान, त्यांनी पदवीधर निवडणुकीच्या मतदानासाठी मतदारांना आवाहन केले आहे.