Home उपराजधानी नागपूर विधान परिषद शिक्षक,पदवीधर निवडणूक प्रतिष्ठेचीच

विधान परिषद शिक्षक,पदवीधर निवडणूक प्रतिष्ठेचीच

75

नागपूर : राज्यात आज विधान परिषदेच्या पाच शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात मतदान होत आहे. मागील वर्षी सत्तेत आलेली महाविकास आघाडी प्रथमच राज्यातील निवडणुकीला सामोरे जात आहे.
नागपुरात पदवीधर निवडणूक ही भाजपसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. याठिकाणी महापौर संदीप जोशी उभे आहेत़ त्यांच्यासमोर काँगे्रसचे अभिजीत वंजारी यांचे आव्हान आहे. सध्या सत्तेत आणि विरोधी पक्षात असलेल्या नेत्यांसाठी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची ठरली आहे.
अमरावती शिक्षक निवडणुकीतील विजयातून शिवसेना आणि भाजपला आपले वर्चस्व सिद्ध करता येणार आहे. औरंगाबाद पदवीधर निवडणूक माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्यासाठी प्रतिष्ठेचा विषय झाला आहे.
पुणे पदवीधर तसेच शिक्षक विधान परिषद निवडणुकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्याचवेळी पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे, हे जयंत पाटील यांना सिद्ध करावे लागणार आहे.
दरम्यान, अजित पवार, देवेंद्र फडणवीस, जयंत पाटील, चंद्र्रकांत पाटील, अशोक चव्हाण, नितीन राऊत, विजय वड्डेटीवार, रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे, आशिष शेलार, धनंजय मुंडे, प्रीतम मुंडे, सतेज पाटील, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, विश्वजित कदम, यशोमती ठाकूर आदी नेत्यांच्या प्रचार कितपत फळ मिळते हे निकालाच्या दिवशी कळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here