Home BREAKING NEWS पदवीधर निवडणुकीचे मतदान 69 टक्के

पदवीधर निवडणुकीचे मतदान 69 टक्के

20

पुणे : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या तीन पदवीधर, दोन शिक्षक आणि एक स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील निवडणुकीसाठी आज मतदान पार पडले. यामध्ये सायंकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी 69.08 टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली.
माहितीनुसार, सर्वाधिक मतदान पुणे शिक्षक मतदारसंघात नोंदवण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्यातील टक्केवारी ही तब्बल 86 टक्क्यांच्या आसपास होती. वाढलेले मतदान नेमके कोणाला फायदेशीर ठरते हे निकालाद्वारे स्पष्ट होईल. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतरची ही पहिलीच प्रत्यक्ष निवडणूक होती. त्यात महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस विरूद्ध भाजप असा थेट सामना दिसून आला. भाजपने 5, राष्ट्रवादी 2, काँग्रेस 2 तर शिवसेनेनं एका जागेवर ही निवडणूक लढवली आहे.
मतदारसंघ निहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे आहे. औरंगाबाद पदवीधर 61.08 टक्के, पुणे पदवीधर 50.30 टक्के, नागपूर पदवीधर 54.76 टक्के, अमरावती शिक्षक मतदारसंघ 82.91 टक्के, पुणे शिक्षक मतदारसंघ 70.44 टक्के तर धुळे-नंदुरबार स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात सुमारे 99.31 टक्के मतदान झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here