Home राजधानी मुंबई शिवसैनिक म्हणूनच काम करणार : ऊर्मिला

शिवसैनिक म्हणूनच काम करणार : ऊर्मिला

83

मुंबई : मी शिवसैनिक म्हणूनच काम करणार आहे. काम करण्याची इच्छा असल्याने कोणत्याही अपेक्षाविना शिवसेनेत प्रवेश केला आहे, अशी प्रतिक्रिया अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर यांनी व्यक्त केली. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आयोजित केलेल्या पत्रपरिषदेत त्या बोलत होत्या.
त्यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘मातोश्री’ निवासस्थानी रश्मी ठाकरे यांनी ऊर्मिला मातोंडकर यांच्या हातावर शिवबंधन बांधले.
काँँग्रेस सोडताना मी राजकारण कधी सोडले नाही. लोकांमध्ये जाऊन त्यांच्यासाठी काम करण्याची इच्छा आहे. शिवसेनेची महिला आघाडी भक्कम आहे़ मुंबईत महिला सुरक्षित असून आणि त्यामुळे मुंबईचा मला अभिमान आहे.
मधल्या काळात बॉलीवूडची काळी बाजू दाखवण्याचा प्रयत्न झाला. बॉलीवूड काही स्टारचे नाही तरअसंख्य लोक काम करतात. ते मुंबईच्या रक्ताशी जोडलेले असून बॉलीवूड व मुंबई कधीही वेगळे होणार नाही, असेही स्पष्ट केले.