उत्तर प्रदेशात भीषण अपघात, आठ मृत, दोघे गंभीर

राष्ट्रीय

कौशांबी : रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारवर खडीने भरलेला ट्रक उलटून भीषण अपघात झाला असून यात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तसेच, अन्य दोघे गंभीर जखमी झाले़
वृत्तसंस्थानुसार, विवाह सोहळ्याचा कार्यक्रम संपवून घरी जात असताना कार आज बुधवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास रस्त्याच्या बाजूला थांबली होती. याचवेळी खडी असलेला ट्रक जात असताना टायर फुटल्याने तो कारवर उलटला़ त्यामुळे आठ जणांचा जागीच मृत्यू झाला़ पैकी एका महिलेचा रुग्णालयात मृत्यू झाल्याचे समजते. मृतांमध्ये महिला, मुले आणि पुरुषांचा समावेश असून ते सर्व एकाच कुटुंबातील आहेत. यात नवरदेवाची बहीण, काकू, मामीचाही समावेश असल्याचे सांगण्यात येते.
दरम्यान, यापूर्वी 19 नोव्हेंबरच्या रात्री उशिरा उत्तर प्रदेशात प्रतापगड जिल्ह्यात विवाह सोहळ्यातून परत असलेली एक जीप ट्रकला मागून धडक दिली़ यात 14 जणांचा मृत्यू झाला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *