Home उपराजधानी नागपूर विधानसभा पदवीधर, शिक्षक मतदारसंघात मतमोजणी सुरू

विधानसभा पदवीधर, शिक्षक मतदारसंघात मतमोजणी सुरू

64

नागपूर : नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली असून पहिला कौल दुपारी दोननंतर येणार येऊ शकतो. तर, निकाल रात्री उशिरा किंवा शुक्रवारी पहाटेपर्यंत लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 3 लाख 73 हजार 166 पैकी 2 लाख 40 हजार 796 मतदारांनी मतदान केले. आज सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर रात्री आठ नंतरच निकाल येतील असा अंदाज आहे. मतदारांची मतदानाची टक्केवारी वाढल्याने यावेळी 56 टेबलवर मतमोजणी होत आहे़
दरम्यान, धुळे आणि नंदुरबार स्थानिक स्वराज संस्थेच्या विधानपरिषद पोटनिवडणुकीच्या मतमोजणीत भाजपचे अमरीश पटेल विजयी झाले. अमरीश पटेल यांना 332 तर काँग्रेसचे अभिजित पाटील यांना 98 मते मिळाली आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here