Home उपराजधानी नागपूर मराठा समाजातील बेरोजगारांसाठी कर्ज योजना

मराठा समाजातील बेरोजगारांसाठी कर्ज योजना

62

नागपूर : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कर्जयोजना बेरोजगार उमेदवारांसाठी उपलब्ध असून, गरजू उमेदवारांना स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी व्याजाचा परतावा या योजनेअंतर्गत अर्थ साहाय्य दिल जाते. बेरोजगार उमेदवारांनी www.mahaswayam.gov.in या वेब पोर्टलवर आॅनलाईन पद्धतीने अर्ज सादर केल्यानंतर LOI (Letter Of Intent) उत्पन्न होतो़ बँकेने संबंधित उमेदवाराच्या कर्ज प्रस्तावाला मान्यता दिल्यास महामंडळाकडून व्याजाची रक्कम उमेदवाराच्या बचत खात्यात परत करण्यात येते. सदर महामंडळाची योजना केवळ मराठा समाजातील उमेदवारांसाठी मर्यादित असून, गरजू उमेदवारांनी आॅनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त प्रभाकर हरडे यांनी केले आहे.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्यादित मुंबई अंतर्गत वैयक्ति कर्ज व्याज परतावा योजनेमधून लाभार्थ्यांना बँकेमार्फत रुपये 5 कोटी 27 लाख 43 हजार इतक्या रकमेचे कर्ज वाटप करण्यात आलेले आहे. महामंडळामार्फत रुपये 38 लाख 60 हजार 328 रुपयांचा व्याज परतावा लाभार्थ्यांच्या वैयक्तिक बचत खात्यात जमा करण्यात आला आहे. तसेच, गट कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत 70 हजार रुपयांचे कर्ज बँकेमार्फत जमा करण्यात आले आहे.
कर्ज योजनांचा तपशिल असा आहे़ वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (आयआर-1) कर्ज रक्कम 10 लाख रुपयांची मर्यादा, गट प्रकल्प कर्ज व्याज परतावा योजना (आयआर-2) कर्ज रक्कम 10 लाख ते 50 रुपयांची मर्यादा आणि गट प्रकल्प कर्ज योजना (एफपीओ) (जीएल-1) कर्जाची रक्कम 10 लाख रुपये.
या प्रक्रियांबाबत काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विभाग, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नवीन प्रशासकीय इमारत क्र. 2, दुसरा माळा (ए विंग) सिव्हिल लाईन्स, नागपूर या कार्यालयात जिल्हा समन्वयक प्रियंका कपले 8830947957 आणि विक्रांत पºहाड 8788235917 या क्रमांकावर संपर्क साधावा.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here