Home नागपूर नागपुरात काँग्रेसचे अभिजीत वंजारी विजयी

नागपुरात काँग्रेसचे अभिजीत वंजारी विजयी

27

नागपूर : नागपूर पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे अभिजीत वंजारी विजयी ठरले आहेत. त्यांनी भाजपचे संदीप जोशी यांचा पराभव केला. औरंगाबादेत महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण, तर पुण्यात अरुण लाड विजयी झाले.
अभिजित वंजारी यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली होती. त्यांनी ही आघाडी अंतिम फेरीपर्यंत कायम ठेवत भाजपचा किल्ला उध्वस्त केला. अभिजित वंजारी यांना एकूण 55 हजार 947, संदीप जोशी यांना 41 हजार 540, अतुल कुमार खोब्रागडे यांना 8 हजार 499 तर निलेश कराळे यांना 6 हजार 889 मते मिळाली. नागपुरात सुरुवातीला विजयासाठी निश्चित केलेला मतांचा कोटा पूर्ण न करू शकल्यामुळे आज पहाटे मतमोजणीचा भाग क्रमांक 2 सुरू करण्यात आला. मात्र, याठिकाणी काँग्रेसचे अभिजीत वंजारी आघाडीवर होते.
मराठवाडा पदवीधर मतदार संघ निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांचा विजय झाला. चव्हाण यांनी सलग तिसरा विजयाची हॅटट्रिक पूर्ण केली. पहिल्या फेरी पासून सतीश चव्हाण यांनी घेतलेली आघाडी पाचव्या फेरीपर्यंत कायम राहिली. सतीश चव्हाण यांना एकूण 116638 मते मिळाली. तर भाजपचे शिरीष बोराळकर यांना 58743 मते मिळाली. पाचव्या फेरी अखेर सतीश चव्हाण 57895 मतांनी विजयी घोषित करण्यात आले. मराठवाडा पदवीधर मतदार संघ निवडणुकीत 35 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते.
दरम्यान, महाविकास आघाडीमुळे फायदा झाला आणि मताधिक्य वाढल्याची प्रतिक्रिया विजयी उमेदवार सतीश चव्हाण यांनी व्यक्त केली.
पुण्यात अरुण लाड विजयी
पुणे पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड यांनी भाजप उमेदवार संग्राम देशमुख यांचा पराभव केला. त्यांनी 48 हजार 824 हजारांच्या मताधिक्यानी दणदणीत विजय मिळवला आहे. अरुण लाड यांना एकूण 1 लाख 22 हजार 145 मत, तर संग्राम देशमुख यांना 73 हजार 321 मिळाली.
दुसरीकडे पुणे विभागातील शिक्षक मतदारसंघात काँग्रेसचे जयंत आसगावकर आघाडीवर, तर अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात अपक्ष सरनाईक आघाडीवर आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here