Home रानशिवार मणिपूरमधील नोंगपोक सेमकई पोलिस ठाणे सर्वाेच्च

मणिपूरमधील नोंगपोक सेमकई पोलिस ठाणे सर्वाेच्च

98

Top Ten Police Stations : केंद्रीय गृह मंत्रालयाने जाहीर केलेल्या देशातील सर्वाेच्च दहा पोलिस ठाण्याची यादीमध्ये मणिपूर राज्यातील थौबल येथील नोंगपोक सेमकई ठाण्याला पहिले स्थान मिळाले आहे.
केंद्र सरकारच्या यादीत नोंगपोक सेमकई पोलिस पहिले तर, दुसºया आणि तिसºया स्थानावर तामिळनाडू आणि अरुणाचल प्रदेशातील ठाण्यांचा समावेश आहे. अतिशय आव्हानात्मक परिस्थितीत उत्तमपणे काम करणाºया संस्थांची निवड करण्यात आली आहे. मात्र, यात महाराष्ट्राचा समावेश नाही.
देशातील या ठाण्यांचा समावेश आहे़ नोंगपोक सेमकई (थौबल, मणिपूर), एडब्ल्यूपीएस सुरमंगलम (सालेम, तामिळनाडू),
खरसांग (चांगलांग, अरुणाचल प्रदेश), झिलमिल (सुरजापूर, छत्तीसगड), संगुएम (दक्षिण गोवा, गोवा), कालीघाट (अंदमान आणि निकोबार), पॉकयोंग ( सिक्किम), कांठ (मुरादाबाद, उत्तर प्रदेश), खानवेल (दादरा आणि नगर हवेली) आणि
जम्मीकुंटा टाउन (करीमनगर, तेलंगणा)
काही निकष
-अतिशय प्रतिकूल परिस्थित उत्कृष्टपणे काम करणे
– गुन्ह्यांची उकल आणि त्यासाठीचा वेळ
– महिलांसंबंधी तक्रार सोडविण्याची पद्धत
– कोरोना प्रोटोकॉलचे पालन