Home उपराजधानी नागपूर ‘विठूमाऊली की विठोबा!’ काव्यसंग्रहाला माय मराठी प्रतिष्ठानाचा राज्यस्तरीय पुरस्कार

‘विठूमाऊली की विठोबा!’ काव्यसंग्रहाला माय मराठी प्रतिष्ठानाचा राज्यस्तरीय पुरस्कार

73

नागपूर : सावनेर येथील सुप्रसिद्ध कवी गणेश भाकरे यांच्या ‘विठूमाऊली की विठोबा!’ या काव्यसंग्रहाला माय मराठी प्रतिष्ठान (पुणे) यांचा प्रथम पुरस्कार प्राप्त झाला आहे. मुर्तिजापूर येथील शब्ददीप प्रकाशन या संस्थेने प्रकाशक म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.

महाराष्ट्रातील मान्यवर साहित्यिकांच्या वाड्.मयातून निवडीचे काटेकोर निकष लावत निवड समिती व रसिकांच्या अभिप्रायाद्वारे साहित्य कृतींची निवड करण्यात आली. यात ‘विठूमाऊली की विठोबा!’ काव्यसंग्रह पात्रतेस उतरला. यापूर्वी कवितासंग्रहाला गीतरामायणकार ग. दि. माडगुळकर यांच्या नावाने राज्यस्तरीय ‘गदिमा पुरस्कार’ प्राप्त झाला आहे. ग्रामीण जीवनाचे भेदक चित्रण यात दिसून येते.गणेश भाकरे यांच्या ‘आसवांची शाई’ कवितासंग्रहाला आणि ‘प्रकाशाचा दिवा’ बालकाव्यसंग्रहालाही विविध सन्मानाचे पुरस्कार मिळालेले आहेत. या मोठ्या सन्मानाबद्दल सृजन साहित्य संघ, शब्ददीप प्रकाशन मूर्तिजापूर, गीतकार-कथालेखक संजय मुंदलकर, पत्रकार शिल्पा वकलकर, मित्रपरिवार आदींनी कवी गणेश भाकरे यांचे अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here