गायींचे उत्पादन वाढवण्यासाठी भ्रूण जैवतंत्रज्ञान प्रयोगशाळेचा लाभ : सुनील केदार

उपराजधानी नागपूर

नागपूर : राज्यातील शेतकºयांकडे असलेल्या दूध उत्पादक गायींचे उत्पादन वाढविण्यासाठी भ्रूण जैवतंत्रज्ञान प्रयोगशाळेचा लाभ होईल, असा आशावाद पशु संवर्धन, दुग्ध विकास मंत्री सुनील केदार यांनी व्यक्त केला.

राष्ट्रीय गोकुळ मिशनच्या सहकार्याने नागपुरातील तेलंगखेडी येथील भ्रूण जैवतंत्रज्ञान प्रयोगशाळेचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी होते. जिल्हा परिषद कृषी व पशु संवर्धन सभापती तापेश्वर वैद्य, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आशिष पातुरकर, डॉ. ए. पी. सोमकुंवर, डॉ. एन. व्ही. कुरकुरे, डॉ. बी. राऊत, सुधीर दिवे, डी. एस. रघुवंशी, एम. एस. मावसकर, डॉ. सुधीर दुदलवार, आदी उपस्थित होते.

राज्य शासन दूध उत्पादन व इतर जोडधंद्यामधून आर्थिक स्तर उंचावण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यासाठी बकरीपालनातून उच्च प्रतीचे दूध, दुग्धजन्य पदार्थ, मांस यांचे उत्पादनात वाढ करणार आहे. शेतकºयांच्या मदतीला पशुवैद्यकीय अधिकारी, कर्मचाºयांसह पशुसंवर्धन विभागाची व्हॅन दिली आहे. त्यासाठी पशुवैद्यकीय व्हॅन 1962 नंबर आहे. व्हॅन 15 मिनिटांत पोहोचेल, असेही त्यांनी सांगितले. जैव तंत्रज्ञान प्रयोगशाळेतून निर्माण होणारे बैलाचे भ्रूण हे अधिक शक्तीशाली आणि गायींची दूध देण्याची क्षमता जास्त विकसित करण्यात भर देण्यात येत आाहे. उत्पादित भ्रूण राज्यातील पशुसंवर्धन करणाºया शेतकºयांकडे पोहोचल्यास जीवनमान उंचावण्यास मदत होईल. त्यासाठी राज्यातील पशुवैद्यकांना मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षण देण्यात येईल, असेही सुनील केदार यांनी सांगितले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तीन कोटी रुपयांचा निधी खर्चून उभारण्यात आलेल्या प्रयोगशाळेचा जास्तीत जास्त उपयोग शेतकºयांना व्हावा, त्याचे जीवनमान उंचावले जावे, त्यांचा आर्थिक स्तर उंचावला जावा, असे सांगून केंद्र शासन व राज्य शासनाच्या समन्वयाने हे भ्रूण जास्तीत जास्त गायींपर्यंत पोहोचविण्यासाठी पशुवैद्यकांना प्रशिक्षण देण्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *