Home राजधानी मुंबई ‘बबड्याचे आजोबा’ रवी पटवर्धन यांचे निधन

‘बबड्याचे आजोबा’ रवी पटवर्धन यांचे निधन

105

मुंबई : ‘अग्गबाई सासूबाई..’ या मालिकेत ‘बबड्याचे आजोबा’ म्हणून प्रसिद्ध झालेले ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचे शनिवारी रात्री यांचे हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झाले. ते 83 वर्षांचे होते.
रवी पटवर्धन यांनी मराठी – हिंदी चित्रपटांसह नाटक, मालिकांतही भूमिका साकारल्या आहेत. सध्या घराघरांत पोहोचलेल्या ‘अग्गबाई सासूबाई..’ या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारात होते.
6 सप्टेंबर 1937 रोजी रवी पटवर्धन यांचा जन्म झाला.1974 मध्ये त्यांनी रत्नाकर मतकरींबरोबर ‘आरण्यक’ नाटकात धृतराष्ट्राची भूमिका साकारली होती. विशेष म्हणजे वयाच्या 82 व्या वर्षीही ही भूमिका साकारली. मराठी मनोरंजनजगात त्यांचा एक दबदबा होता. झुपकेदार मिशा, आवाजातील जरब आणि गंभीर चेहरा अशी त्यांची ओळख होती. दरम्यान, रवी पटवर्धन यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here