समवैचारिकांचा संग… SAAY pasaaydan

रानशिवार

 संत राजिन्दरसिंह जी महाराज

आपल्या आध्यात्मिक प्रगती करता आपली संगत अत्यंत महत्त्वाची आहे. असे म्हणतात की, मनुष्य आपल्या संगतीनेच ओळखला जातो. जर आपण धनवान लोकांबरोबर जास्तीत जास्त वेळ व्यतित करत असू, तर आपण अधिकांश समय धनाविषयी विचार करत राहू. जर आपण नशीले पदार्थ म्हणजेच व्यसनाधीन असणाºया लोकांच्या संगतीत राहिलो तर आपल्यातही दुर्गुण रुजण्याची शक्यता आहे. जर आपण जुगार खेळणाºया लोकांच्या संगतीत राहिलो तर सहजच आपणही जुगारी बनू. भांडखोरांच्या संपर्कात राहिलो तर आपला स्वभाव सुद्धा शब्दाशब्दांवर वाद घालणारा होईल.

महान चिनी विचारवंत मेंसियस यांच्या जीवनातील एक घटना याच विषयावर प्रकाश टाकते. मेंसियसची आई इतर मातांप्रमाणे बुद्धिवान महिला होती. आपल्या जीवनकाळात आपल्या मुलांकरिता त्यांनी तीनदा आपले निवासस्थान बदली केले. सुरुवातीला ते एका स्मशानभूमीजवळ राहात होते. एक दिवस त्यांना असे वाटले की आपला मुलगा अति दु:खी होत आहे. स्मशानभूमीमध्ये येणारे लोक दु:खी होऊन रडत,विव्हळत असत. त्यांना हे मूल पहात असे. मुले आपल्या आजूबाजूच्या वातावरणाने फारच लवकर प्रभावित होतात. म्हणून तो त्यांच्यासारखेच वर्तन करत होता. यामुळे मेंसियसच्या आईला चिंता वाटली आणि त्यांनी तिथून अन्य ठिकाणी जाण्याचा निश्चय केला. आता ते वर्दळ असणाºया एका बाजारात राहू लागले. काही काळानंतर त्यांनी पाहिले की, त्यांचा मुलगा मेंसियस एका दुकानदाराप्रमाणे वर्तन करू लागला आहे. तो घरातील सामान सजवून एका दुकानदारालाप्रमाणे बसत असे. तो बाजारातील दुकानदार व ग्राहक यांच्यातील जसे संभाषण ऐकायचा तसेच तो इतरांशी बोलत असे. त्यांच्या आईला त्यांचे असे वर्तन पाहून चिंता वाटू लागली. त्यांनी तिथून सुद्धा जाण्याचा निश्चय केला. मेंसियसच्या आईने आता एका विद्यालयाजवळ घर घेतले. तिथे मेंसियस बुद्धिमान विद्यार्थ्यांचे अनुसरण करू लागला. तो वेगवेगळ्या विषयांची माहिती प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करू लागला. तसेच अनेक विषयांवर शोध करू लागला. हे पाहून ती अतिशय प्रसन्न झाली. याच वातावरणात मोठा होऊन मेंसियस चीनचा एक खूप मोठा विद्वान बनला. ही गोष्ट एका आईची बुद्धिमत्ता तसेच त्यागाविषयी सांगते, जो तिने आपल्या मुलाला सर्वोत्तम वातावरण देण्यासाठी केला. ही गोष्ट आपल्या जीवनात आपल्या संगतीचा प्रभाव दर्शवते.

जर आपल्याला कलाकार व्हायचे असेल तर, आपणास कलाकारांच्या संगतीत राहिले पाहिजे. आपल्याला डॉक्टर व्हावयाचे असेल तर आपल्याला अशा लोकांबरोबर वेळ घालवला पाहिजे जे चिकित्सा क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत. आपल्याला सद्गुणी व्हायचे असेल तर आपण अशा संगतीत राहावे ज्यांच्यात चांगुलपणा भरलेला आहे. जर आपल्याला आध्यात्मिक व्हायचे असेल तर आपण आध्यात्मिक विचारवंतांबरोबर रहावे.

आपले जीवन अमूल्य आहे. आपण ठराविक श्वासांची तिजोरी बरोबर घेऊन आलो आहोत. याच कालावधीत आपल्याला आपले जीवन उद्देश्य प्राप्त करायचे आहे. आपली आध्यात्मिक प्रगती करून आपण दुसºयांची सेवा करू शकतो. आपल्याला काही लोक आपल्या ध्येयापासून परावृत्त करतात आणि आपल्याला या संसाराच्या मायेचा दलदलीमध्ये खेचून घेतात. त्यांच्या बरोबर समय व्यतित करणे म्हणजे जीवनातील श्वासांना निरर्थक करणे होय. आपणास निश्चय करावा लागेल की, आपल्याला जीवनामध्ये काय प्राप्त करायचे आहे? एकदा निश्चय करून आपल्या ध्येयाप्रति आपल्याला अग्रेसर व्हायचे आहे. समान विचारधारा असणाºया लोकांच्या संगतीत आपली पाउले तीव्र गतीने जीवनाच्या ध्येयाप्रति उचलली जातात.

*****

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *