दिल्ली पोलिसांकडून पाच दहशतवादी अटक

राष्ट्रीय

Five Mlitant Arestted : दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने आज दिल्लीतील शकारपूर परिसरातून एका चकमकीनंतर पाच संशयित दहशतवाद्यांना ताब्यात घेतले. यापैकी दोनजण पंजाबचे तर तीनजण काश्मीरचे आहेत.
पोलिस उपायुक्त प्रमोद कुशवाह यांच्यानुसार, तिघेजण हिज्बुल मुजाहिद्दीनशी संबंधित असून पंजाबमधील दोघे आयएसआयशी संबंधित आहेत. या अटकेमुळे ही पाकिस्तानी संघटना खलिस्तान चळवळीला काश्मीरमधील दहशतवादाशी जोडत असल्याचे स्पष्ट होत आहे, असेही कुशवाह यांनी सांगितले.
दरम्यान, संशयित दहशतवाद्यांकडून दोन किलो हेरॉईन, शस्त्रसाठा आणि एक लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *