Home राजधानी मुंबई जिल्हा परिषद शाळांसंबंधी थोरातांचे मोठे वक्तव्य

जिल्हा परिषद शाळांसंबंधी थोरातांचे मोठे वक्तव्य

95

मुंबई : जिल्हा परिषदेच्या शाळांमधून जागतिक दजार्चे शिक्षण दिले जात असून आता इंग्रजी शाळांबरोबर स्पर्धा करणाºया शाळा म्हणून जिल्हा परिषदेच्या शाळा ओळखल्या जात आहेत. यासाठी रणजितसिंह डिसले यांच्यासारख्या शिक्षकांचा मोलाचा वाटा आहे, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. श्री. थोरात म्हणाले, जिल्हाधिकारी झालेले अनेकजण जि.प शाळेचे विद्यार्थी होते. वेगळी वाट निवडून शिक्षण क्षेत्रात काम करणाºया डिसले यांच्यासारख्या शिक्षकांमुळे इंटरनॅशनल म्हणवणाºया शाळांतील मुलेही एक दिवस परत जि. प शाळेत शिकायला येतील, अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

राज्याला अभिमान : गायकवाड
डिसले सरांनी शैक्षणिक क्षैत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे महाराष्ट्राचे नाव देशातच नव्हे तर साºया जगभर पोहोचविणाºया रणजितसिंह डिसले सरांच्या कायार्चा अभिमान वाटतो, असे गौरवोद्गार शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी काढले.
जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमधून जास्तीत जास्त तंत्रस्नेही व सृजनशील शिक्षक निर्माण करण्यासाठी मी प्रयत्न करणार अशी भावना सत्कार समारंभाला उत्तर देताना रणजितसिंह डिसले यांनी व्यक्त केली.

युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर पुरस्कार जाहीर झाला. सोलापूरच्या परितेवाडी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना 7 कोटी रुपयांचा हा पुरस्कार प्राप्त झाला. लंडनमधील नॅचरल हिस्ट्री म्युझियम मध्ये झालेल्या समारंभात सुप्रसिद्ध अभिनेते स्टीफन फ्राय यांनी याची अधिकृत घोषणा केली. असा पुरस्कार मिळणारे ते पहिलेच भारतीय शिक्षक ठरले आहेत. जगभरातील 140 देशांतील 12 हजारांहून शिक्षकांच्या नामांकनातून अंतिम विजेता म्हणून डिसले सरांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्रच नव्हे तर देशातील शिक्षण क्षेत्रांत अभिनवं क्रांती केलेल्या कामाची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.