Home उपराजधानी नागपूर उपराजधानी नागपूरसह पुणे, नाशिक बाजारपेठांमध्ये शुकशुकाट

उपराजधानी नागपूरसह पुणे, नाशिक बाजारपेठांमध्ये शुकशुकाट

75

: कृषी कायद्याविरोधात आज भारत बंदची हाक देण्यात आली आहे. महाराष्ट्रात ठिकठिकाणी भारत बंदला सुरुवात झाली आहे. राज्याची उपराजधानी नागपूरसह पुणे, जालना, नाशिकमध्ये बाजारपेठांमध्ये शुकशुकाट पाहण्यास मिळत आहे. काही ठिकाणी शेतकरी संघटना शांततेनं निषेध व्यक्त करत आंदोलन करत असल्याची माहिती आहे.

बर्डी मेन रोड
बर्डी मेन रोड

नागपुरातील बहुतांश चौकातील वाहतूक रोडावली असून बर्डी मेन रोड येथे ग्राहकांची संख्या एकदम कमी दिसून आली़ शहर वाहतूकही काहीशी कमी होती़ मुख्य बसस्थानक असलेल्या व्हेरायटी चौकात प्रवाशांची संख्या एकटी दुकटी दिसून आली. तसेच, रस्त्यांवरील वाहतूक काहीशी कमी झालेली होती.

नाशिकमध्ये भारत बंदमध्ये लासलगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या सहभागी झाल्या आहेत. त्यामुळे लिलाव बंद असल्याने बाजार समित्यात शुकशुकाट पसरला आहे.

पुण्यात मार्केट यार्ड सुरू असले तरी फक्त भाजीपाला विभाग सुरू आहे. दुपारपर्यंत दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय पुणे व्यापारी महासंघाने घेतला आहे.

 महाराज बाग रोड
महाराज बाग रोड

जालन्यात मोफत दूध वाटप
भारत बंद आंदोलनाला जालन्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दूध वाटप करून पाठिंबा देण्यात आला. जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे बाळगोपाळांना तसेच ग्रामस्थांना दूध वाटप करून आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. कुठे ही अनुचित प्रकार न करता आणि शेतमालाचा नुकसान न करता शांततेत दिवसभर बंद पाळण्यात येणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून जाहीर करण्यात आले.