Home उपराजधानी नागपूर विधानभवनात नवनिर्वाचित पाच सदस्यांनी घेतली शपथ

विधानभवनात नवनिर्वाचित पाच सदस्यांनी घेतली शपथ

58

नागपूर : महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेच्या नागपूर, औरंगाबाद, पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातून आणि पुणे, अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातून विधानपरिषदेवर निर्वाचित झालेल्या पाच नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी विधानभवनात आज पार पडला.

विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी नवनिर्वाचित सदस्यांना शपथ दिली. औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश चव्हाण, नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेले अभिजित वंजारी (काँग्रेस),पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातून निवडून आलेले काँग्रेसचे जयंत आसगांवकर आणि अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातून विजयी झालेले किरण सरनाईक (अपक्ष) यांनी सदस्यत्वाची शपथ घेतली.
कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here