भारतात लवकरच फाईव्ह-जी तंत्रज्ञान, पंतप्रधानांची ग्वाही

रानशिवार

mobile india congress : भारत लवकरच दूरसंचार क्षेत्रातील उपकरणे, विकास व उत्पादन व डिझाईन सेंटर बनवण्याचे काम करेल. सोबतच कोट्यवधी भारतीयांना सक्षम करण्यासाठी फाईव्ह-जी तंत्रज्ञानही देशात आणले जाईल, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.
कोरोना काळात एकमेकांपासून लांब राहून देखील नागरिक व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आणि टेक्नॉंलॉजीच्या मदतीने एकमेकांशी जोडलेले होते. यात विद्यार्थी घरी बसून अभ्यास करू शकतो, तर डॉक्टर देखील आपल्या प्रयोगशाळेत आपल्या रुग्णाला तपासू शकतात,असेही पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *