शेतकरी आंदोलन, गृहमंत्र्यांसोबतची बैठकही निष्कर्षाविना

रानशिवार

नवी दिल्ली : गृहमंत्री अमित शाह आणि शेतकरी संघटनांमध्ये मंगळवारी रात्री पार पडलेल्या बैठकीतून काहीही निष्पन्न झाले नसून शेतकरी नेत्यांची बुधवारी केंद्र सरकारसोबत कोणतीही बैठक होणार नसल्याची माहिती आहे. तसेच, गृहमंत्री अमित शाह यांनी कृषी कायदा मागे घेतला जाणार नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. मागील काही दिवसांपासून केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्याविरोधात देशभरातील विशेष पंजाब, हरयाणा, हिमाचल प्रदेश आदी राज्यातील शेतकºयांनी आंदोलन सुरू केले आहे. पुढे पाऊल म्हणून मंगळवारी ‘भारत बंद’ पाळण्यात आला़ यानंतर अमित शाह यांच्याबरोबर शेतकरी नेत्यांची तब्बल अडीच तास बैठक झाली. मात्र, यातून काहीही बाहेर आले नाही.
दुसरीकडे गृहमंत्री अमित शाह यांनी कृषी कायदा मागे घेतला जाणार नाही, असे स्पष्ट करत कायद्यात कोणते बदल सरकार करता येतील या संदर्भात केंद्र शेतकरी संघटनांना पत्राद्वारे देण्यास तयार आहे. मात्र, इतर काहीही नको, कायदाच रद्द करा यावर शेतकरी संघटना ठाम आहे. दरम्यान, उद्या बुधवारी सिंघु बॉर्डरवर शेतकरी संघटनाची दुपारी बारा वाजता बैठक होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *