Home BREAKING NEWS तामिळमधील ‘या’ अभिनेत्रीची आत्महत्या

तामिळमधील ‘या’ अभिनेत्रीची आत्महत्या

266

Tamil Actress Suicide : तामिळ मालिका, चित्रपटांतील अभिनेत्री व्ही. जे. चित्राने चेन्नईत एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. ती 28 वर्षांची होती. काही दिवसांपूवी चेन्नईतील व्यावसायिक हेमंत रवी यांच्याशी साखरपुडा झाला होता.

विजय टीव्हीवर प्रसारित होत असलेली मालिका ‘पेंडियन स्टोअर्स’मधील भूमिकेमुळं चित्रा प्रसिद्धीला आली होती. दरम्यान, ती नैराश्यात होती अशी माहिती आहे. यातूनच चेन्नईमधील नासरपेट येथील हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे वृत्त आहे.
माहितीनुसार, ईवीपी फिल्म सिटीमधील शूटिंगनंतर चित्रा मंगळवारी मध्यरात्रीनंतर 2.30 च्या सुमारास हॉटेलमध्ये परतली होती. आल्यानंतर तिने आंघोळीसाठी जात असल्याचे सांगितले. मात्र, ती बराच वेळ झाला तरी बाहेर आली नसल्याने हेमंत यांनी हॉटेलच्या कर्मचाºया मदतीने अन्य एका चावीने दरवाजा उघडला असता चित्रा लटकलेल्या अवस्थेत आढळून आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here