Home पूर्व विदर्भ भंडारा जिल्ह्यात ‘माझा व्यवसाय माझा हक्क’ कार्यक्रम

भंडारा जिल्ह्यात ‘माझा व्यवसाय माझा हक्क’ कार्यक्रम

229

भंडारा : कोविड-१९ मुळे अनेकांचा रोजगार हिरावला गेला. नौकरीच्या संधी अत्यल्प झाले आहे. सुशिक्षितांची नोकरीसाठीची भटकंती थांबावी यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतून व्यवसाय इच्छुकांना स्वत:चा व्यवसाय करण्यासाठी ‘माझा व्यवसाय माझा हक्क’ हा कार्यक्रम अतिशय उपयुक्त ठरणार असून नोकरीच्या मागे न लागता स्वत:चा व्यवसाय उभारून इतरांना रोजगार द्या, असे आवाहन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केले. बेरोजगारांना स्वत:चा व्यवसाय उभा करण्यासाठी सर्व प्रकारचे मार्गदर्शन व मदत करून तरुण-तरुणींना उद्योगपती करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हा परिषद सभागृहात ‘माझा व्यवसाय माझा हक्क’ कार्यक्रमाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. आमदार नरेंद्र भोंडेकर, जिल्हाधिकारी संदीप कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून, निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन पानझाडे, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक एच.के.बदर, कौस्तुभ बुटला व संतोष पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

भंडारा जिल्हा हा नैसर्गिक साधन संपत्तीने विपुल असून विविध क्षेत्रात संधी उपलब्ध आहेत. सुशिक्षित तरूणांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निमिर्ती योजनेतून या संधी प्रत्येक इच्छुकांपर्यंत पोहचविण्यात येईल. अर्ज भरणे, अर्ज आॅनलाईन अपलोड करणे, बँक कर्ज प्रकरण तयार करणे, प्रोजक्ट रिपोर्ट तयार करणे तसेच व्यवसायासाठी लागणाºया फिरत्या वाहनाचे दुकान स्ट्रक्चर तयार करून देणे यासाठी विनाशुल्क मार्गदर्शन केले जाईल़ यासाठी साकोली व भंडारा येथे हेल्प डेस्क उभारला जाईल, नाना पटोले यांनी सांगितले.
अर्ज व अधिक माहितीसाठी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचे जनसंपर्क कार्यालय, साकोली येथे संपर्क साधावा. तसेच, 9423673985, 9004367449 व 9004175649 या क्रमांकावर संपर्क साधावा.