Home नागपूर रोजगार मेळाव्यासाठी आॅनलाईन नोंदणी करावी

रोजगार मेळाव्यासाठी आॅनलाईन नोंदणी करावी

33

नागपूर : आज शनिवार आणि रविवारी होणाºया आॅनलाईन महारोजगार मेळाव्यासाठी जिल्ह्यातील युवक-युवतींनी मोठ्या संख्येंनी आॅनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन पालकमंत्री डॉ. नितीन राऊत ( niteen raut ) यांनी आज केले. विशेष म्हणजे आजपर्यंत सात हजार उमेदवारांनी आॅनलाईन नोंदणी केली असून, नोंदणी प्रक्रिया सुरू राहणार आहे.

12 आणि 13 डिसेंबरला दोन दिवसांच्या कालावधीत राज्यस्तरीय महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.  http//www.rojgar.mahaswayam.gov.in  या पोर्टलवर रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. नागपूर विभागाला 8,500 तर नागपूर शहराला चार हजार उमेदवारांचे लक्ष्य दिलेले आहे. बेरोजगार उमेदवारांनी आॅनलाईन अर्ज करून हमखास नोकरी मिळवावी. त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी असल्याचे त्यांनी सांगितले.

मेळाव्यात उच्चशिक्षित ते अशिक्षित उमेदवारांना रोजगाराच्या संधी प्राप्त होणार असून डॉक्टर, पारिचारिका, रूम बॉय, एचआर, व्यवस्थापक, सुरक्षा रक्षकापर्यंत तसेच आयटीआय प्रशिक्षण प्राप्त टर्नर, फिटर, प्लम्बर, मशिनिस्ट, मोटार मॅकनिक, डिझेल मॅकेनिक, सीएनसी आॅपरेटर, ब्रायलर अटेंडंट, कुशल व अकुशल कामगार, तंत्रनिकेतन पदविका, अभियांत्रिकी पदवी, कृषी पदवीधर, व्यवस्थापनातील पदवी, लेखापाल इत्यादी विविध क्षेत्रातील नोकºया उपलब्ध होणार आहेत. कोरोनाच्या संकटाने अर्थचक्र काही प्रमाणात संथ झाले होते. रोजगाराच्या संधीद्वारे अर्थचक्र गतिमान करण्यासाठी राज्यस्तरीय महारोजगार मेळाव्याचा उपक्रम असल्याचे सरकारच्या वतीने सांगण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here