स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजीराजे या ऐतिहासिक मालिकेत महाराणी येसुबाई यांची कणखर आणि निर्भिड पात्र रंगवणारी अभिनयासक्त कलाकार म्हणजे प्राजक्ता गायकवाड ( prajakta gaikwad ) . तिच्या अभिनयाला महाराष्ट्रातूनच नव्हे तर जगभरातील शिवप्रेमींनी भरघोस साद दिली.
छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनासोबतच महाराणी येसुबाई यांच्या आयुष्यावर पहिल्यांदाच महत्त्वाची माहिती लोकांपर्यंत पोहोचली आहे. या मालिकेत महाराणी येसुबाई प्राजक्ता गायकवाड हीचे देखील भरभरून कौतुक झाले. याशिवाय ‘आई माझी काळुबाई’ मालिकेतही ती झळकली आहे. यापूर्वी तिने ‘लक्ष्य’ आणि ‘नांदा सौख्य भर’ या मालिकांमध्ये भूमिका केली आहे. ‘तू माझा सांगाती’ मालिकेतही ‘संत सखुबाई’ची भूमिका साकारली होती.
अभिनयाबरोबर तिच्या सौंदर्यांचेही तितकेच कौतुक होत आहे. आपल्या कारकिर्दीत सुरुवातीलाच अभिनयाची छाप सोडली असून एक चाहतावर्ग देखील निर्माण केला आहे. प्राजक्ताने संगणक अभियांत्रिकीतील पदविका घेतली आहे. शिकत असतानाही तिने नाटक, एकांकिकामधून भूमिका केल्या आहेत. ती मूळची पुण्याची असून 6 आॅक्टोबर ही तिची जन्मतारीख आहे.