रात्री बायकोनं मला विचारलं …Tapori Turaki

टपोरी टुरकी ....Jocks for You

पुणेकर : लातूरला येण्यासाठी पास चालेल का?
लातूरकर : असे काय नाही बे, ‘नापास’बी चालतंय…

***

ग्राहक : वाह… आॅर्डर देते ही दाल फ्राय तैयार, बहुत तेज सर्विस है आपकी. बहोत बढीया.
ग्राहक : वैसा कुछ नही. जब ग्राहक 15 मिनिटतक मेन्यू कार्ड को ही देखता रहे, तो हम तुरंत दाल फ्राय रेडी करवा देते हैं.

***

संज्या : माझ्या बहिणीच्या हाताला काय चव आहे,अहाहा…
नम्रता : नका फार कौतुक करू…भाऊबिजेच्या एक दिवशीच गिळायला जाणार… मग का नाही चांगलं करणार?
संज्या : अगं, अस्सं… तुझा भाऊ मला म्हणाला.

***

सीमा : तुम्ही एकही काम नीट नाही करू शकत?
दिनकर (वैतागून) : आता काय झालं? काय केलं मी?
सीमा : काल तुम्ही जे सिलेंडर लावलं होत ना…
दिनकर : हो, काय झालं मग?
सीमा : काय माहित कसं लावलं? कालपासून वेळा दूध उतू गेलंय…

***

वैशाली : काय हो, भविष्याबद्दल तुमचं काय मत?
प्रशांत : लग्न झालेले नवरे शक्यतो वृत्तपत्रात वा इतर ठिकाणी राशी भविष्य बघत नाहीत. ते सकाळी सकाळी बायकोचा चेहरा बघूनच ओळखतात,आजचा दिवस कसा जाणार

***

दे ठसक्का…

अचानक रात्री बायकोनं मला विचारलं, हे सीबीआय, ईडीवाले ५/६ वर्षे जुनी मोबाईल चॅट कोणत्या सॉफ्टवेयरनं शोधून काढतात हो.
देवा शप्पथ रात्रभर डोळ्याला डोळा लागला नाही राव…

*****

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *