Home उपराजधानी नागपूर प्रत्येक विभागाचे 100 टक्के खर्चाचे नियोजन करावे

प्रत्येक विभागाचे 100 टक्के खर्चाचे नियोजन करावे

67

नागपूर : कोरोना पार्श्वभूमीवर राज्यातील मोजक्या काही जिल्ह्यांना 100 टक्के निधी विकास योजनांसाठी मिळाला आहे. कोरोना संदर्भातील महत्वपूर्ण कामांसह जिल्ह्याच्या विकासासाठी सर्व विभागांनी पुढील चार महिन्यात योग्य नियोजनानुसार 100 टक्के खर्च करावा, असे निर्देश राज्याचे ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनमध्ये आयोजित जिल्हा वार्षिक योजनेतील सर्वसाधारण, आदिवासी उपयोजना, विशेष घटक योजना आढावा सभेमध्ये ते बोलत होते. या सभेला जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, नागपूर महानगर विकास प्राधिकरणच्या महानगर आयुक्त शीतल उगले, अतिरिक्त पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर, जिल्हा नियोजन अधिकारी मिलिंद नारिंगे यासह विविध विभागांचे जिल्हास्तरीय प्रमुख उपस्थित होते.

मंत्र्यांनी बैठकीत 2019 -20 मार्च अखेर झालेल्या खर्चाचा आढावा घेतला. तसेच सर्वसाधारण, आदिवासी उपयोजना, विशेष घटक योजना अंतर्गत माहिती,नोव्हेंबर 2020 पर्यंत प्राप्त निधी, वितरित नीधी व झालेल्या खचार्चा आढावा घेतला. तसेच, यापूर्वी नागपूर महानगर व नागपूर जिल्ह्यासाठी आवश्यक नाविन्यपूर्ण योजनांची सद्यस्थिती त्यांनी जाणून घेतली. राज्याच्या नियोजन विभागाने जिल्हास्तरीय योजनांसाठी काही तांत्रिक बाबी नव्याने अनिवार्य केल्या आहेत. त्यामध्ये आयपास यंत्रणेवर सर्व प्रस्ताव देणे आवश्यक आहे. नागपूरसारख्या प्रगत जिल्ह्यांमध्ये नव्या तंत्रज्ञानातील सर्व प्रस्ताव आवश्यक आहे. पुढील आठवड्याभरात यासंदर्भात उर्वरित सर्व प्रस्ताव तपास यंत्रणेने मार्फतच नियोजन अधिकाºयांकडे सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले. कोणत्याही परिस्थितीत कोणत्याच विभागाने निधी यावर्षी समर्पित करू नये. कोरोना प्रादुर्भाव काळामुळे पुढील चार महिन्यांचे मर्यादित उद्दिष्ट असून या वर्षी सर्वसाधारण योजनेसाठी असणारे 400 कोटी, विशेष घटक योजनेसाठी असणारे 127 कोटी, तर आदिवासी उपयोजनेसाठी असणारे 42 कोटी रुपये शंभर टक्के खर्च होईल, अशा पद्धतीचे प्रत्येक विभाग प्रमुख आणि नियोजन करावे, असे निर्देश दिले.