यंत्रमागधारकांच्या समस्यांचा अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञांची समिती

राजधानी मुंबई

मुंबई : यंत्रमाग उद्योगाला नवसंजीवनी देण्यासाठी व यंत्रमागधारकांच्या समस्यांचा अभ्यास करण्यासाठी वस्त्रोद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांची समिती गठित करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांनी दिली.

भिंवडीचे आमदार रईस शेख यांच्या नेतृत्वाखालील यंत्रमाग धारकांच्या शिष्टमंडळाने वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन त्यांना दिले. त्यावेळी श्री. शेख यांनी हा निर्णय घेतला.

टाळेबंदीचा इतर उद्योगांप्रमाणेच यंत्रमाग उद्योगालाही फार मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. यंत्रमाग उद्योगातील कामगारांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. हातमाग ( hand loom ) आणि यंत्रमाग कापड तयार करण्याच्या व्यवसायासाठी भिवंडी शहर प्रसिद्ध असून देशातील एकूण 21 लाख लूम पैकी भिवंडी शहरामध्ये तब्बल 9 ते 10 लाख लूम कार्यरत आहेत. या उद्योगातील निरनिराळ्या कामांसाठी मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित व अस्थलांतरित कामगार- मजूर येत असतात; परंतु टाळेबंदी व निर्यात घसरणीमुळे कापडनिर्मितीच्या व्यवसायाचे फारच मोठे नुकसान झालेले आहे. त्यामुळे तब्बल 20 लाख कामगारांचा रोजगार धोक्यात आला आहे, अशी माहिती मंत्र्यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *