शाहू,फुले,आंबेडकर यांच्या मार्गावर चालत समाजकारण व्हावे

राजधानी मुंबई

Sharad Pawar Birthday : शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा पुढे नेणारी नवी पिढी घडवणे हे आजच्या घडीचे सर्वात मोठे आव्हान असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. आपल्या ८० व्या वाढदिवसानिमित्त शनिवारी मुंबईत यशवंतराव चव्हान प्रतिष्ठान येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी विज्ञानाची कास धरत समाज घडवण्यासाठी आपले आयुष्य वेचले, आपण सगळ्यांनी याच मार्गावर चालत समाजकारण करायला हवे, असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी आजपर्यंत दिलेल्या सहकार्यासाठी त्यांनी सर्वांचे आभार मानले. दरम्यान, वाढदिवसानिमित्त देशभरातून शरद पवार यांना शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्री आणि कार्यकर्त्यांनी देखील त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *