राज्य विधिमंडळाचे आजपासून हिवाळी अधिवेशन

राजधानी मुंबई

Maharashtra Winter Assembly : मुंबईत आज सोमवारपासून दोन दिवसाचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. अवघ्या काही तासांच्या अधिवेशनात सरकार पुरवण्या मागण्या आणि महत्त्वाची काही विधेयके मंजूर करून घेणार असून विरोधकांनी हाताशी असलेल्या वेळेत राज्यातील काही महत्त्वाच्या विषयावर आक्रमक भूमिका घेण्याचे नियोजन केले आहे.
दरवर्षी विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात आयोजित होत असते; परंतु यंदा कोरोना महामारी काळात नागपुरातील आमदार निवास ‘क्वारंटाईन सेंटर’ करण्यात आले होते. याशिवाय या काळात सर्व यंत्रणा नागपूरला हलवणे अशक्य असल्याने यंदाचे हिवाळी अधिवेशन मुंबईतच घेण्याचा निर्णय सरकारने घेतला असून ते 14 आणि 15 डिसेंबर असे दोन दिवस चालेल. दुसरीकडे राज्य सरकारने आयोजित केलेल्या चहापानावर विरोधी पक्षाने बहिष्कार टाकला असताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत भाजपवर जोरदार हल्ला चढवला.
दरम्यान, राज्यावर आलेले नैसर्गिक संकट, कोरोना महामारी, मराठा आरक्षण आदी मुद्यावर विरोधक आक्रमक पवित्रा घेऊ शकतात़ तसेच, ओबीसींच्या मुद्यावरही सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न होऊ शकतो. कायदा व सुव्यवस्था, महिला अत्याचार आदी घटनांवरून सुद्धा विरोधक आक्रमक भूमिका घेऊ शकते़ तर महिला सुरक्षेच्या दृष्टिकोनातून राज्य सरकारने नुकताच मंजूर केलेला ‘शक्ती कायदा’ यासह काही महत्त्वाच्या विधेयकांना मंजुरी मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *