नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांना कोरोनाची लागण झाली आहे. नड्डांनी सोशल मीडियावरून याबाबत माहिती दिली. त्यांचे पुढील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
माहितीनुसार, नड्डा तीन दिवसांपूर्वीच पश्चिम बंगाल दौºयावर होते. याठिकाणी त्यांनी 9 आणि 10 डिसेंबरला रॅलीमध्ये सहभाग घेतला होता.
दरम्यान, एका ट्विटद्वारे कोरोनाचे लक्षण दिसल्यानंतर चाचणी केली असून त्यात पॉझिटिव्ह आलो आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार होम आयसोलेशनमध्ये आहे. संपर्कात आलेल्यांनी तपासणी करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.