Farmers Protests : कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलनाचा रविवारी 18 वा दिवस पार पडल्यानंतर आज सोमवारी उपोषण करण्यात येणार आहे.
शेतकरी नेत्यांनी रविवारी संध्याकाळी पत्रकार परिषदेतून याबाबत माहिती दिली. सोमवारी दिल्ली सीमेवर सर्व शेतकरी नेते सकाळी 8 वाजतापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत उपोषण करणार आहेत. याशिवाय सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन केले जाईल. भारतीय शेतकरी संघटनेचे प्रवक्ते राकेश टिकैत यांनी याबाबत माहिती दिली. गाझियाबाद सीमेवर काही चुकीच्या व्यक्ती आंदोलनात सामील झाल्याचे दिसून आल्यानंतर त्यांना आम्ही हटवले आहे. यापुढे असा लोकांवर बारकाईने लक्ष ठेवले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.